फर्स्ट क्लासच्या पासवर करा एसी लोकलमधून प्रवास, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फे-या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण असतानाच आता रेल्वे प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फर्स्ट क्लासच्या पासवर आता प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेकडून देण्यात येणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

मध्य रेल्वेकडून अंमलबजावणी

साध्या लोकलचा फर्स्ट क्लास पास एसी लोकलच्या पासमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिमकडून चाचणी करण्यात येत होती. ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून मध्य रेल्वेकडून 24 सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः Calling App साठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार? असे आहे विधेयक)

कोणाला मिळणार लाभ?

याचा लाभ घेण्यासाठी फर्स्ट क्लास पासधारकांना आपला फर्स्ट क्लासचा पास एसी लोकलच्या पासमध्ये रुपांतरित करावा लागणार आहे. मात्र ही सुविधा केवळ फर्स्ट क्लासचा त्रैमासिक(Queterly),सहामाही(Half yearly) आणि वार्षिक(Yearly) पास असणा-या प्रवाशांनाच मिळणार आहे.

असा करा पास रुपांतरित

या पासधारकांना फर्स्ट क्लासचा पास आणि एसी लोकलचा पास या पासदरांतील फरक भरुन तिकीट खिडकीवर आपला पास एसी लोकलच्या पासमध्ये रुपांतरित करता येणार आहे. एसी लोकलना प्रवाशांना मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य सरकारची थेट नोकरीची हमी, टाटा सामाजिक संस्थेसोबत करार! कशी आहे योजना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here