Metro Ticket on whats App : आता व्हॉटसॲपवरुन बुक करता येणार मेट्रोचे तिकीट

घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो वन ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट देणे सुरू केले आहे. प्रवाशांचा वेळ वाचवा तसेच कागदी तिकीटांचा वापर कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

212
Metro Ticket on whats App : आता व्हॉटसॲपवरुन बुक करता येणार मेट्रोचे तिकीट
Metro Ticket on whats App : आता व्हॉटसॲपवरुन बुक करता येणार मेट्रोचे तिकीट

घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन तिकीट काढण्याची योजना आणली आहे.  (Metro Ticket on whats App )प्रवाशांना मेट्रो चे तिकीट व्हॉटसॲपवर काढता येणार असून त्यामुळे प्रवाशांना त्यांचे तिकीट कुठूनही बुक करता येणार आहे. (Metro Ticket on whats App)

मुंबईतील पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर (Varsova to Ghatkoar) पर्यंत धावली. या मेट्रोला प्रवाशांचा हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडले जात असल्याने या मार्गावरील वाहतूककोंडी कमी झाली आहे तसेच या भागातील नागरिकांना मेट्रोमुळे दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मेट्रोच्या तिकीटांसाठी रांगा लागत आहे. त्यामुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी व्हॉटसॲपवर तिकीट काढण्याचे नियोजन केले आहे.मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबई मेट्रो वनने २०१७ साली मोबाईल क्युआर तिकीट, अमर्यादित प्रवासासाठी पास इत्यादि सुरू केले. (Metro Ticket on whats App )

(हेही वाचा : IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामात एका षटकात २ बाऊन्सरना परवानगी )

९० कोटी लोकांचा प्रवास

मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वन मधून आत्तापर्यंत ९० कोटी प्रवाशांनी सेवा दिली. ही सेवा ८ जून २०१४ रोजी सुरू करण्यात आली. मुंबई मेट्रो वनच्या दररोज ४०८ फेऱ्या होतात. त्यात ४.६ लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत दर ३.५ मिनिटांनी आणि ऑफ-पीक अवर्समध्ये दर ८ मिनिटांनी एक मेट्रो धावते. या मेट्रोमुळे शहरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.