नवीन वैद्यकीय महाविद्यालये(मेडिकल कॉलेज) स्थापन करण्यासाठी असलेल्या पात्रता निकषांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच हे कायदे अंमलात येणार आहेत. त्यानुसार नवीन वैद्यकीय महाविद्याय सुरू करण्यासाठी यापुढे एक हजार खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे.
एक हजार खाटांचे महाविद्यालय
देशात कुठेही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी असणे बंधनकारक आहे. सध्याच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या क्षमतेनुसार 300 ते 500 खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. पण असे रुग्णालय चालवणे देखील महाविद्यालय प्रशासनाला कठीण जात असल्यामुळे एक हजार खाटांचे महाविद्यालय चालवणे ही अशक्य गोष्ट असून आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे काही महाविद्यालयांच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या नव्या नियमाला किती पाठिंबा मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कसे आहेत नवीन बदल?
सध्याच्या निकषांतील बदलांचा मसुदा तयार करण्यात आला असून तो आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नियमन(दुरुस्ती) 2022 असे या कायद्याचे नवीन स्वरुप असेल. त्यानुसार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांवर एकाच संस्थेची मालकी असावी, तसेच संबंधित इमारत इतर कोणत्याही कारणांसाठी वापरू नये, असेही काही नवीन नियम समाविष्ट करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community