मुंबईकरांनो आता ध्वनी प्रदूषणापासून होणार सुटका! वाचा आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय

122

पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाल्यापासून, संजय पांडे यांनी नागरिकांच्या रोजच्या तक्रारींवर विशेष लक्ष दिले आहे. त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर, लगेचच उलट्या दिशेने वाहन चालवणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आता मुंबईकरांना होणारा वाढता ध्वनीप्रदूषणाचा त्रास लक्षात घेत,संजय पांडे यांनी बांधकाम व्यवसायिकांना आणि कामगारांना रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

ट्वीट करत माहिती

संजय पांडे हे नारिकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमावर येणा-या प्रत्येक नागरिकांची तक्रार आणि समस्येकडे ते लक्ष वेधत आहेत. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. त्यानंतर पांडे यांनी नामांकित बांधकाम व्यवसायिकांची भेट घेतली आणि सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच बांधकाम करण्याचे त्यांनी मान्य केले, असं ट्विट पांडे यांनी बैठकीनंतर केले.

( हेही वाचा :‘या’ तारखेपासून प्लास्टिकची पिशवी वापराल तर सावधान! )

आयुक्तांच्या सूचना

  • बांधकाम स्थळी आवाज रोखणारे अडथळे बसवा.
  • आवाजाची पातळी डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त नको.
  • रक्षक मुख्य रस्त्यांवरच न ठेवता केवळ बांधकामाच्या ठिकाणी तैनात करावा.
  • आवाजाची पातळी फक्त 65 डेसिबलच्या खाली असावी.
  • बांधकामांच्या ठिकाणी कामाचे तास दाखवणारे फलक लावावेत. सर्वच बांधकाम ठिकाणी वेळ आणि डेसिबल पातळी दर्शवणारे फलकही असतील याची विकासकांनी दक्षता घ्यावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.