राज्यामध्ये यापूढे वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असणार आहे. 10 लाख रुपये दंड भरुन ग्रामीण भागातील सेवा टाळण्याची सवलत आता बंद करण्यात आली आहे. आरक्षण आणि शुल्क सवलत मिळवणा-या विद्यार्थ्यांना आता ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक केले जाणार आहे. यावर्षी वैद्यकीय सेवेसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, काही वर्षे ग्रामीण भागात सेवा द्यावी लागणार आहे.
म्हणून ग्रामीण भागात सेवा बंधनकारक
कोरोना काळात ग्रामीण महाराष्ट्रात डाॅक्टरांची वणवा होती. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेली अनेक दशके 10 लाख रुपये दंड भरुन ग्रामीण भागातील सेवा टाळता येत होती. आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्यात सध्या मेडिकलच्या 3600 जागा आहेत, त्यातील 2800 या सरकारी जागा आहेत. यातील जवळपास 60 टक्के डाॅक्टर ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यास नकार देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील डाॅक्टरांची वणवा भरुन काढण्यासाठी आता ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
( हेही वाचा: शिवाजीपार्कमधील नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम निकृष्ट )
Join Our WhatsApp Community