War : आता किम जोंग उन यांची अण्वस्त्र युद्धाची धमकी; आता पूर्व आशियात युद्ध पेटणार

136

इराण-लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात युद्ध (War) पेटले आहे. त्यातच आता पूर्व आशियातही अशांतता वाढताना दिसत आहे. इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता उत्तर कोरियाने धमकी दिली. 10 हजार किलोमीटर दूरवर असलेल्या अमेरिकेचेही टेन्शन वाढेल. हुकूमशहा किम जोंग उनने थेट अमेरिका आणि दक्षिण कोरियालाचा न्यूक्लिअर अ‍ॅटॅकची अथवा अण्वस्त्र हल्ल्याची (War) धमकी दिली आहे.

(हेही वाचा Marathi Bhasha Abhijat Darja : हा ज्ञानेश्वर माऊली, छ. शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान; राज्यपालांनी केले मराठी भाषिकांचे अभिनंदन)

संबंध खराब असल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वैरामुळे केव्हाही युद्ध (War) भडकू शकते. जर उत्तर कोरियाला चिथावणी दिली गेली अथवा हल्ला केला गेला, तर उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा वापर करून दक्षिण कोरियाला पूर्णपणे नष्ट करेल, अशी धमकी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दिली आहे. किम जोंग उन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची राजवट संपुष्टात येईल, असा इशारा दक्षिण कोरियाच्या नेत्याने दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला हा इशारा (War) दिला आहे. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ (केसीएनए) ने दिलेल्या वृत्तानुसार, हुकूमशहा किम जोंग उन यांनी बुधवारी स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसच्या तुकडीला भेट दिली यावेळी ते म्हणाले, आपल्या देशावर दक्षिण कोरिया अथवा त्याचा मित्र असलेल्या अमेरिकेने हल्ला केला, तर आपले लष्कर न डगमगता अण्वस्त्रांसह सर्व प्रकारच्या आक्रामक शस्त्रांस्त्रांचा वापर करेल, असे किम जोंग उन म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.