मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली रविवार (२५ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागाचे तब्बल १९ निर्णय घेण्यात आले. यात सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थी, यांच्यासह ज्येष्ठांसाठी महामंडळ (Corporation for Senior Citizens) बनवण्यात येणार असून त्यातून सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ होईल असं मंत्रिमंडळात सांगण्यात आले आहे. (Cabinet Meeting)
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य… pic.twitter.com/uFGHzOdJtv— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 25, 2024
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले १९ निर्णय थोडक्यात…
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा (वित्त विभाग)
- राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली (ऊर्जा विभाग)
- गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ (सार्वजनिक आरोग्य)
- ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार (क्रीडा विभाग)
- थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी (ऊर्जा विभाग)
- पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार (जलसंपदा विभाग)
- नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा (जलसंपदा विभाग)
- सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी (सहकार विभाग)
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत (सामान्य प्रशासन)
- ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ (सामाजिक न्याय)
- ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार (सामाजिक न्याय)
- ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ (सामाजिक न्याय)
- मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार (गृहनिर्माण विभाग)
(हेही वाचा – Sexual Assaulted : पुण्यात कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण)
- कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ (उच्च व तंत्रशिक्षण)
- कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ (नगरविकास विभाग)
- चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल (नगरविकास विभाग)
- श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना (महसूल विभाग)
- पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य (वस्त्रोद्योग विभाग)
- सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन (सहकार विभाग)
हेही वाचा –