कोरोना महामारीत २ वर्षे लॉक डाऊन होता, त्यामुळे सर्व व्यवस्था बंद होती, मात्र आता सर्व व्यवहार पुन्हा पाहिल्याप्रमाणे सुरु झाले आहेत. उद्योग-व्यवसाय जोर घेऊ लागला आहे. त्यामुळे आता अर्थचक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे कंपन्या त्याचा फायदा कामगारांना करून देण्याच्या विचारात आहे.यंदाच्या वर्षी कंपन्या कामगारांना भरघोस पगारवाढ देण्याच्या तयारीत आहेत. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या नफ्यामुळे यावेळी कंपन्या कर्मचाऱ्यांना सरासरी ९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
सरासरी १२ टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता
२०१९ मध्ये कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी दिलेल्या ७ टक्के सरासरी वाढीपेक्षा ही २ टक्के अधिक आहे. स्टार्टअप्स, न्यू एज कॉर्पोरेशन्स आणि युनिकॉर्न्समध्ये, कर्मचाऱ्यांनाही यावर्षी बंपर पगारवाढ मिळू शकते. त्यांना सरासरी १२ टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल स्पेशलिस्ट रिक्रूटमेंट ग्रुप मायकेल पेज इंडियाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार बँकिंग, वित्तीय सेवा उद्योग, मालमत्ता-बांधकाम क्षेत्रात गुंतलेल्या कामगारांनी यावेळी चांगली पगारवाढ मिळवून दिली. भारतातील ई-कॉमर्सचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे आणि सर्व क्षेत्रे त्यांच्या व्यवसायाचे डिजिटल परिवर्तन करण्यात गुंतलेले आहेत. व्यवसाय क्षेत्रातील मूड सकारात्मक मायकल पेज इंडियाचे व्यवस्थापकिय संचालक अंकित अग्रवाल म्हणाले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे ८.३ टक्के दराने वाढली आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी, अर्थव्यवस्था ८.७ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात जास्तीत जास्त वाढ अपेक्षित आहे. डेटा सायंटिस्ट, वेब डेव्हलपर आणि क्लाउड आर्किटेक्ट यांना जास्त मागणी असेल.
(हेही वाचा दुकानांच्या पाट्यांवरील नावे मराठीत ठसठशीत अक्षरात लिहा; महापालिकेचे दुकान,आस्थापनांना निर्देश!)
Join Our WhatsApp Community