रेशन कार्ड हे सरकारी कामांसाठी सर्वात महत्वाचे असे कागदपत्र मानले जाते. त्यामुळे रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. पण त्यासाठी अनेकदा कार्यालयाच्या पाय-या झिजवाव्या लागतात. पण नागरिकांची ही धावपळ टाळण्यासाठी आता केंद्र सरकारकडून एक कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी सुरू करण्यात आली असून, प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
काय आहे सुविधा?
माय रेशन-माय राईट या नावाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे पात्र नागरिकांची ऑनलाईन ओळख पटवून राज्यांमध्ये रेशन कार्ड बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सुविधांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना आता रेशन कार्ड सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी राहत्या घराची कागदपत्रे असणे आवश्यक नाही. यामध्ये नागरिकांना आपल्या राज्याची किंवा निवासाची माहिती द्यावी लागेल. यानंतर कॉमन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही माहिती संबंधित राज्याला शेअर केली जाईल. त्यानंतर सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच रेशन कार्ड तयार केले जाईल.
या राज्यांमध्ये सुरुवात
महाराष्ट्र, आसाम, गोवा, लक्षद्वीप, मेघालय, मणिपूर, मिझाराम, नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांत ही सुविधा सुरुवातीला सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत देखील ही सुविधा लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community