आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही लांबणीवर… काय आहे निर्णय?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

कधी होणार परीक्षा?

या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली.

(हेही वाचाः १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! कधी होणार परीक्षा? वाचा…)

याआधी या परीक्षा लांबणीवर

याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडल्यानंतर, त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here