मुंबईत गोवरचे संशयित रुग्ण वाढले, आरोग्य पथकाचा मुक्काम वाढला

मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराचा हॉटस्पॉट ठरलेल्या एम पूर्व या गोवंडीतील विभागाला शनिवारी केंद्रीय व राज्य आरोग्य पथकाने भेट दिली. सप्टेंबर महिन्यापासून मुंबईतील पाच प्रमुख विभागांमध्ये गोवर मोठ्या संख्येने पसरला आहे. त्यामुळे मुंबईतील या पाच विभागांतील आरोग्य यंत्रणेतील परिस्थिती समजून घेण्यासाठी आरोग्य पथकाच्या सदस्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

( हेही वाचा : शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही – बावनकुळे)

मुंबईतील गेल्या दोन दिवसांपासून शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी संशयित गोवर रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या ५८४ वर होती. शनिवारी या संख्येत वाढ होत ६१७ वर पोहोचली. शनिवारपासून आरोग्य पथकाच्या सदस्यांनी एम-पूर्व विभागाला तसेच गोवरच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यप्रकरणी घटनास्थळाला भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत क्षेत्रीय भेटीच सुरु असल्याने संपूर्ण विभागाची क्षेत्रीय भेट अधिका-यांना देता आलेली नाही. पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे पथक रविवारीही क्षेत्रभेट देणार आहेत. मात्र संपूर्ण मुद्दा हा एम-पूर्व भागातील वाढत्या केसेसबाबत चर्चिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका आरोग्य विभागानेही गोवरची संख्या वाढू नये म्हणून आतापर्यंत एम पूर्व भागांत १ हजार २१० बालकांना एमआर १ प्रकाराची लस तर ९९५ बालकांना एमएमआर प्रकाराची लस दिली आहे. आतापर्यंत ८० हजार ६०३ घरांचे सर्व्हेक्षण केल्याची माहितीही दिली गेली.

  • मुंबईत गोवरचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी पालिका अधिका-यांनी केलेल्या घरांच्या सर्व्हेक्षणाची संख्या -९ लाख १६ हजार ११९
  • मुंबईत लसीकरण झालेल्या बालकांची संख्या – एम आर १ – ५ हजार ६४८ , एमएमआर – ४ हजार २३५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here