राज्याच्या उपराजधानीतही बीए व्हेरीएंट

राज्याच्या उपराजधानीतही आता बीए व्हेरीएंटचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉनच्या बीए 5 उपप्रकाराचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात बीए 4 आणि 5 या उपप्रकारचे आतापर्यंत 19 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 54 वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात मुंबईहून नागपूरला प्रवास केल्याने मुंबईहून नागपूरला बीए व्हेरीएंट पोहोचल्याचे निदर्शनात आले. 29 वर्षीय बीए बाधित पुरुषाने केरळाहून प्रवास केला होता. महिलेला 9 जून रोजी तर पुरुषाला 6 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती.

दोन्ही रुग्णांमध्ये बीए व्हेरिएंट आढळून आल्याचे नागपूरच्या निरी संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले. या दोन्ही रुग्णांना घरगुती विलगीकरणातून बरे केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here