राज्याचा गृहविभाग येत्या अधिवेशनानंतर एक प्रस्ताव घेऊन येणार आहे. यानुसार पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली.
सेवा ज्येष्ठतेच्या माध्यमातून शिपाई होतील पोलिस उपनिरीक्षक!
गृहविभागाच्या माहितीनुसार एखादा तरुण पोलिस शिपाई म्हणून भरती झाला, तर निवृत्त होईपर्यंत त्याला एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचता यावे. अर्थात आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष इत्यादी बाबी पदोन्नतीसाठी लागू होते. मात्र आता हे निकष तर असतीलच, त्याचबरोबर एखादा पोलिस सेवाज्येष्ठतेच्या माध्यमातून निवृत्त होईपर्यंत पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी महाराष्ट्र गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे. यामुळे आयुष्यभर हवालदार म्हणून सेवारत राहणाऱ्या पोलिस शिपायांना सेवानिवृत्त होताना तरी मानसन्मान मिळणार आहे.
(हेही वाचा : पोलिसाने न्यायालयालाच घातला गंडा! २१ लाख रुपये दंडाची रक्कम लाटली!)
काय आहे ट्विट?
पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
Join Our WhatsApp Communityपोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021