आता Reels दिसणार टीव्हीवर ; कसं ? वाचा सविस्तर …

आता Reels दिसणार टीव्हीवर ; कसं ? वाचा सविस्तर ...

172
आता Reels दिसणार टीव्हीवर ; कसं ? वाचा सविस्तर ...
आता Reels दिसणार टीव्हीवर ; कसं ? वाचा सविस्तर ...

जगभरात इंस्टाग्रामचा वापर केला जात आहे. बहुतेक लोक रील्स (Reels) पाहण्यासाठी आणि पोस्ट करण्यासाठी इंस्टाग्राम वापरतात. रील्सने अनेकांना वेडं लावलं आहे. बहुतांश लोकांना शॉर्ट व्हिडिओ रिल्स (Reels) बघण्यास रस असतो. सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ यातच जातो. मात्र ही तर फक्त सुरूवात आहे असं तुम्हालाही वाटेल कारण देशातील २ बड्या केबल टीव्ही पुरवठादार कंपन्यांनी रिल्स बेस्ड चॅनेल लॉन्च केला आहे. (Reels)

हेही वाचा-Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी

रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीचे हॅथवे डिजिटल आणि डेन नेटवर्क्स यांनी हे काम सुरू केले आहे. शॉर्ट फॉर्म व्हिडिओसाठी २ नवीन चॅनेल हॅथवे रिल्स आणि डेन रिल्स लॉन्च करण्यात आलेत. आता ज्या गोष्टी मोबाईलवर सर्वाधिक वापरल्या जातात त्या टीव्हीवर का आणलं जातंय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. परंतु हे पाऊल इन्स्टाग्राम रिल्स आणि युट्यूब शॉट्ससारख्या सोशल मिडिया प्लॅटफोर्मवरील ट्रेंडिंग व्हिडिओ टीव्हीवर दाखवण्यासाठी उचललं आहे. (Reels)

हेही वाचा- AI : आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स’ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गुन्हेगार जेरबंद

कंपन्या यातून अशा युवा वर्गाला आकर्षिक करू इच्छिते ज्यांचा जास्त वेळ रिल्स (Reels) बघण्यात जातो. या नवीन २ टीव्ही चॅनेलवर डान्स, गायन, अभिनय आणि कॉमेडी संबंधित रिल्स दाखवण्यात येतील. लोक त्यांच्या रिल्स या चॅनेलवर पाठवू शकतात. जो कन्टेंट निवडला जाईल तो टीव्हीवर प्रसारित करण्यात येईल. त्यातून कन्टेंट क्रिएटर्सला त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी नवीन व्यासपीठ मिळेल. (Reels)

हेही वाचा- World Health Day निमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’ विशेष उपक्रमाचे आयोजन

मोबाईलवर लोक त्यांच्या वेळेनुसार हवे ते आवडीचे रिल्स पाहतात परंतु टीव्हीवर एका टाइम स्लॉटमध्ये प्रेक्षकांना आकर्षिक करणे आव्हान असणार आहे. परंतु पालकांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्याची मुले मोबाईलवर जास्त वेळ रिल्स, शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात घालवतात. जर त्यांना टीव्हीवर रिल्स पाहायला पर्याय मिळाला तर पालकांना त्यातून दिलासा मिळू शकतो. (Reels)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.