सध्या मुंबई (Mumbai) तसेच उपनगरांमध्ये पाण्याची लाइन, गॅस, टेलीफोन, अशा अनेक कारणासाठी रस्त्यांचे खोदकाम सातत्याने चालू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई येथील वेरावली पाइपलाइन फुटल्याने अंधेरी पूर्व भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. तर ठाण्यातही असाच प्रकार घडला होता. मात्र यापुढे याला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने (Central Government) काही महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या ‘कॉल बिफोर यू डिग’ (Call Before you dig) या प्रणालीची अमंलबजावणी राज्यातील सर्व विभागांना करणारे आदेश जारी करण्यात आले आहे. (New App for Diggers)
रस्त्यांचे खोदकाम करणे आवश्यक असणारी कामे महानगरपालिका, नगरपालिका सार्वजनिक बांधकाम, उद्योग,वन,परिवहन,ऊर्जा,जलसंपदा आणि पाणीपुरवठा या विभागांकडून काढली जातात. आता या सर्व विभागांच्या अंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयांना ‘कॉल बिफोर यू डिग’ या प्रणालीवर नोंदणी बंधन कारक करण्यात आली असून त्यासाठी एक खास ॲप तयार करण्यात आले आहे.
(हेही वाचा : Dheeraj Sahu : ‘तो मी नव्हेच…’; आयकर विभागाच्या छापेमारीनंतर धीरज साहू यांनी दिली पहिली प्रतिक्रिया)
राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने काढलेल्या आदेशानुसार या सर्व विभागांनी रस्ते खोदायचे असल्यास त्यांनी संबंधित कंत्राटदारांना ॲपवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर प्रत्येक विभागाने खोदकाम करण्यापूर्वी कळवायचे आहे. खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी माहितीची नोंद घेऊनच त्यांचे काम करायचे आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधेची गैरसोय होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घ्याची आहे. अन्यथा हि कामे करत असताना कुठले नुकसान झाल्यास त्याची भरपाइ त्या विभागाला देणे बंधनकारक असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community