आता शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक!

सुनंदा शेट्टी यांनी २०१९ ते २०२० मध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे एका जमिनीचा व्यवहार केला होता, हा व्यवहार सुधाकर घारे याच्यासोबत झाला होता.

पोर्नोग्राफीमध्ये अटकेत असलेल्या राज कुंद्राची सासू आणि शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार जुहू पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घारे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

१ कोटी ६० लाखांची फसवणूक!

सुनंदा शेट्टी यांनी २०१९ ते २०२० मध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे एका जमिनीचा व्यवहार केला होता, हा व्यवहार सुधाकर घारे याच्यासोबत झाला होता. सुधाकर घारे याने जमीन आणि बंगला स्वतःच्या नावावर असल्याचे सांगून खोटे कागदपत्रे तयार करून सुनंदा यांच्याकडून एक कोटी ६० लाख घेतले होते. बंगला आणि जमिनीचे बोगस कागदपत्रे असल्याचे लक्षात आल्यानंतर सुनंदा यांनी घारे यांच्याकडे पैसे परत मागितले असता, त्याने पैसे देण्यास नकार दिला. अखेर सुनंदा यांनी न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाच्या आदेशावरून जुहू पोलिसांनी सुधाकर घारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा : अखेर मुंबईत ३० जुलैपासून घरोघरी लसीकरण! कोण आहेत लाभार्थी?)

संबंधित शेतकऱ्याने राजकीय वजन असल्याचे सांगितले!

काही दिवस झाल्यानंतर त्यांना याबाबतची माहिती मिळाली. सुनंदा यांनी सुधाकरला याबाबत विचारणा केली. त्यावर त्यानं व्यक्तीने एका राजकीय पक्षाचे नेते त्याच्या जवळचे असल्याचे सांगत सुनंदा यांना न्यायालयात जाण्यात सांगितले. त्यानंतर सुनंदा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात या जमीन व्यवहारात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुनंदा शेट्टींनी कर्जतमधील एका जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाली असून जमीन विकल्याचा आरोप केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here