देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने प्रचारासाठी प्रचार गीतानंतर आता घोषवाक्य आणले आहे. एकाच वाक्यात सर्वकाही सांगण्याची किमया या घोषवाक्यात आहे.
‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ असे हे घोषवाक्य आहे. भाजपने या निमित्ताने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा संकल्प केला आहे. तसेच ४००हुन अधिक जागा जिंकण्याचाही निश्चय केला आहे. त्यासाठी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक राज्यांमध्ये झंझावाती सभा होतील. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यांबाबतही चर्चा करण्यात आली. याच बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रचाराची दिशा आणि घोषवाक्यही ठरवण्यात आले. दरम्यान पक्षात इनकमिंग करण्यासाठी सोपे जावे यासाठी भाजपने पक्षप्रवेशासाठी समितीची स्थापना केली आहे.
(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा ६१ देशांमध्ये दिसणार)
Join Our WhatsApp Community