छोटा गॅस सिलिंडर वापरताय? मग ही बातमी वाचाच…

123

तुमच्या घरामध्ये छोटा एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी महत्त्वाची आहे. एलपीजी गॅस सिलिंडर आता सहजपणे उपलब्ध होणार आहे, कारण सरकार आता रेशन दुकानांच्या माध्यमातून छोट्या एलपीजी गॅस सिलिंडरची विक्री करणार आहे. या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना अनुदानित सिलिंडर वितरीत करण्यात सरकारला मदत होऊ शकते. रेशन दुकानांच्या जाळ्यामार्फत ५ किलोच्या लहान एलपीजी सिलिंडरची विक्री करण्यास परवानगी देण्याची केंद्राची योजना आहे.

सामान्यांना मोठा फायदा होऊ शकतो

आर्थिक व्यवहार्यता वाढवण्याबाबत राज्य सरकारांशी झालेल्या बैठकीत, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी आउटलेट्सद्वारे लहान सिलिंडरची विक्री करण्याची कल्पना मांडली, ज्याला ओएमसी (ऑइल मार्केटिंग कंपनी OMC)च्या प्रतिनिधींनी देखील पाठिंबा दर्शवला. सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यास सामान्यांना मोठा फायदा होऊ शकतो व एलपीजी गॅस सिलिंडर सहजपणे उपलब्ध होऊ शकतो.

(हेही वाचा : सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक! पोलिसांनी मांडली गोसावीची मोडस ऑपरेंडी)

रेशन दुकाने सक्षम करण्यावर भर

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)च्या मदतीने या रेशन दुकानांची आर्थिक उपयुक्तता वाढवता येईल, असे राज्य सरकारांनी या बैठकीत सुचवले आहे. यानुसार रेशन दुकानांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाईल, तसेच मुद्रा योजनेचा विस्तार देखील रेशन दुकानांद्वारे करण्यात येईल, असे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.