दहावी आणि बारावीच्या मुलांना कुठे मिळणार प्रश्नपेढ्या? बातमीला क्लिक करा आणि लिंक मिळवा!

शिक्षण विभागाच्या नवीन वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट वाढत चालले असून, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काय आहे वर्षा गायकवाड यांचे ट्वीट?

वर्षा गायकवाड यांनी ट्वीटमधून शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न पेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन केले आहे.

(हेही वाचाः ICSE दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर)

या ठिकाणी मिळणार प्रश्नपेढ्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकाराचा सराव आणि माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

कधी आहेत परीक्षा

शिक्षण विभागाच्या नवीन वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here