आता महाविद्यालयात ‘संविधान’ अनिवार्य!

117

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संविधानाचे ज्ञान असावे. तसेच, संविधानातील मुल्यांची ओळख व्हावी. यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता संविधानाचा अभ्यास अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत दिली आहे.

प्रमाणपत्र दिले जाणार

ज्या संविधानावर देश चालतो, त्याची माहिती आणि ज्ञान होण्याच्या दृष्टीने आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी संविधान अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांला संविधान शिकल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

( हेही वाचा: काकाविरुद्ध पुतण्याने वाजवला ‘भोंगा’ )

लवकरच अंमलबजावणी होणार

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परीक्षा, प्रवेश आणि इतर कामकाजासंदर्भात बुधवारी बैठक पार पडली. त्यात भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांच्या विचारांची ओळख पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना व्हावी यावर चर्चा झाली. त्यानंतर असा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे. लवकरच त्यासाठी परिपत्रक जारी केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.