आता टप्प्याटप्प्याने देता येणार पैसे; MHADA ची चार हजार घरांची Lottery निघणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  

1835

मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा (MHADA Lottery) आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतील सुमारे तीन-चार हजार घरांची लॉटरी (Mhada lottery for Four Thousand house) काढणार आहे. त्यानुसार पुढील वर्ष-दीड वर्षात कोणते प्रकल्प पूर्ण होऊ शकतात त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम सुरू असतानाच लॉटरी काढून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने विजेत्यांना टप्प्याटप्याने  घरांचे पैसे भरता येणार आहेत. (MHADA)

(हेही वाचा – shaniwar wada : शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)

मुंबईसह एमएमआार (Mumbai MMR) क्षेत्रातील घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रत्येकाचे म्हाडाच्या लॉटरीकडे (MHADA Lottery) लक्ष असते, म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२४ मध्ये २०२० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल एक लाख १३ हजार अर्ज आले होते, म्हणजे एका घरासाठी ५५ अर्ज एवढी स्पर्धा होती. त्याची दखल घेत म्हाडाने नव्या वर्षात पुन्हा लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत सध्या म्हाडाकडे तयार घरांची किंवा ओसीपर्यंत आलेल्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पांमधील घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांनी २५ टक्के रक्कम भरल्यानंतरच गृहकर्जासाठी (Home Loan) म्हाडाकडून एनओसी मिळते. आता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने पैसे भरता येणार आहेत. घरांची लॉटरी काढताना ही घरे कधीपर्यंत पूर्ण होतील, घराचा ताबा कधी मिळेल, याबाबतची माहिती समोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना घरासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे.

जीएसटीचा भुर्दंड

म्हाडाने बांधकामाधीन (Mhada Construction) इमारतीमधील घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढल्यास संबंधित विजेत्यांना टप्प्याटप्याने घराची रक्कम भरता येणार असली तरी जीएसटीचा भुर्दंड बसणार आहे. बांधकामाधीन इमारतीमध्ये घर खरेदी केले, तर त्यावर जवळपास १२ टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे घर खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी)

घर खरेदीदारांना दिलासा

म्हाडाने घरांची लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना घराचा ताबा देण्याबाबत पत्र पाठवले जाते. त्यानुसार सुरुवातीला घराच्या एकूण किमतीपैकी २५ टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडा गृहकर्जासाठी एनओसी (Home Loan NOC) देते. त्यामुळे एकाचवेळी विजेत्यांना मोठ्या रकमेची जमवाजमव करणे कठीण होते, मात्र म्हाडा बांधकामाधीन घरांची लॉटरी काढल्यानंतर ती पूर्ण होण्यास दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे घर खरेदीदाराला इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यानुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.