आता ‘या’ घटकांसाठी कोविशील्डच्या दुस-या डोसचा अवधी झाला कमी

86

पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक, तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत असणारे कर्मचारी यांना कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल. या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

विदेशात शैक्षणिक, नोकरी – व्यवसाय आणि ऑलिपिंक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणा-या नागरिकांना कोविशील्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस देण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. तसेच वैद्यकीय उपचार किंवा अपरिहार्य कारणांनी विदेशात जाणे आवश्यक असलेल्या व आपल्या प्रांतात परत जाण्यासाठी परदेश गमन करणे अनिवार्य असलेल्या नागरिकांना देखील ही सवलत देण्यात आली होती.

तथापि, पर्यटन आणि इतर कारणांसाठी विदेशात जाण्यास इच्छुक नागरिकांकडून देखील कोविशील्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ऐवजी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याची मुभा मिळावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सुचनांनुसार शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. या आस्थापनांवर कार्यरत कर्मचा-यांना देखील कोविशील्डचा दुसरा डोस २८ दिवसानंतर मिळण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती.

(हेही वाचा : प्रभाग फेररचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप)

या मागणीची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण संदर्भातील सुधारित अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचा-यांना कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल.

कोण आहेत लाभार्थी? 

  • १८ वर्ष व अधिक वयोगटातील नागरिकांकडे वैध पारपत्र (Passport) असेल तर लसीकरणास पात्र
  • पहिली मात्रा घेताना पारपत्र पुरावा म्हणून घेतला नसेल, तरी संबंधीत लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह न करता वेगळे लस प्रमाणपत्र देण्याच्या सूचना
  • शासकीय आणि खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक
  • लसीकरण केंद्रांवरील समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज भरुन घेतल्यानंतर तो प्रमाणित करुन कोविन प्रणालीवर अपलोड करावा.
  • जागतिक आरोग्य संघटनेने कोविशाल्ड लस आपत्कालीन वापरासाठी मान्य केली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र कोविशील्ड लशीचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.