Gurpatwant Singh Pannu : आता समोर आले खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे भारत तोडण्याचे मनसुबे; दिली गंभीर धमकी

142
Gurpatwant Singh Pannu : आता समोर आले खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे भारत तोडण्याचे मनसुबे; दिली गंभीर धमकी
Gurpatwant Singh Pannu : आता समोर आले खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे भारत तोडण्याचे मनसुबे; दिली गंभीर धमकी

खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूला भारताचे तुकडे करून अनेक देश निर्माण करायचे आहेत. त्याला फक्त खलिस्तानच नाही, काश्मीरही वेगळे करून नवा मुस्लिम देश निर्माण करायचा आहे.  त्याने एका ऑडिओ संदेशाद्वारे भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. त्याला आयएसआयची फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Gurpatwant Singh Pannu)

(हेही वाचा – Kesari Tours : भारत-कॅनडा वाद, केसरी टूर्सने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी पन्नूने कॅनडातील हिंदूंना भारतात परतण्याची उघडपणे धमकी दिली होती. ‘भारत हा हिंदूंचा देश आहे आणि त्यांनी कॅनडा सोडून भारतात परतावे. जे शीख खलिस्तानचे समर्थक आहेत तेच कॅनडात राहतील’, असे त्याने म्हटले होते. यानंतर 24 सप्टेंबर रोजी कॅनडातील सत्ताधारी लिबरल पक्षाचे खासदार चंद्रा आर्य यांनी हिंदूंच्या कॅनडातील योगदानाविषयी सांगून त्यांना आश्वस्त केले होते. 2019 मध्ये भारत सरकारने पन्नूची संघटना SFJ वर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा सम्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली बंदी घातली. शिखांसाठी सार्वमताच्या नावाखाली SFJ पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारसरणीला पाठिंबा देत आहे. (Gurpatwant Singh Pannu)

2020 मध्ये पन्नूवर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप होता. यानंतर 1 जुलै 2020 रोजी केंद्र सरकारने पन्नूला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले. 2020 मध्ये सरकारने शीख फॉर जस्टिसशी संबंधित 40 हून अधिक वेबपृष्ठे आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली.

पंजाबी तरुणांना भारताविरोधात भडकावतो

पन्नू सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो पंजाबी भाषेत ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश जारी करतो. ज्यामध्ये तो पंजाबी तरुणांना भारताविरोधात भडकावतो. एवढेच नाही, तर पैशाचे आमिष दाखवून पंजाब आणि हरियाणामधील सरकारी इमारतींवर खलिस्तानचा झेंडा लावला आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या G20 बैठकीदरम्यान त्याने दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खलिस्तानी घोषणाही लिहिल्या होत्या. तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवतो.

शीख फॉर जस्टीस आणि पन्नू यांच्यावर भारतात सुमारे अनेक  खटले दाखल झाले आहेत. यामध्ये पंजाबमधील देशद्रोहाच्या ३ प्रकरणांचा समावेश आहे. पंजाब पोलिसांनी तयार केलेल्या डॉजियरमध्ये एसएफजेने सोशल मीडियावर अनेक वर्षांतील फुटीरतावादी पोस्टची माहिती दिली होती. यामध्ये तो दहशतवाद्यांना पाठिंबा देत असे. (Gurpatwant Singh Pannu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.