पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने बॅंकेच्या पासबुकमध्ये केला ‘हा’ मोठा बदल

146

देशातील कोट्यवधी निवृत्तीधारकांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता निवृत्तीधारकांच्या बॅंकेतील पेन्शन पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक नोंद केले जाणार आहेत. पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक नोंदवल्यानंतर देशातील कोट्यवधी निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेडरेशन ऑफ कोल इंडस्ट्री रिटायर्ड एम्प्लाॅईज असोसिएशनचे संयोजक बिमान मित्रा यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, पेन्शनर्सच्या बॅंक पासबुकमध्ये पीपीओ क्रमांकाची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या मते निवृत्तीधारकांना याविषयीची अद्याप माहितीच नाही.

बिमान मित्रा यांनी पेन्शन पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक टाकण्याचा आग्रह धरला होता. 2021 मध्ये त्यांच्या निदर्शनास सदर बाब आली होती. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने बॅंकांना पेन्शनधारकांचा पीपीओ क्रमांक नोंदवण्याचा आदेश दिला होता. परंतु बॅंकांनी या आदेशाचे पालन केले नसल्याचे मित्रा यांच्या लक्षात आले. त्यांनी याविरोधात संघर्ष केला. या संघर्षामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अन्य सार्वजनिक क्षेत्रातील 5 कोटी पेन्शनर्सला पीपीओ क्रमांक त्यांच्या बॅंकेत खात्यात नोंदवावा लागणार आहे.

( हेही वाचा: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शिक्षण मंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय )

…म्हणून पीपीओ क्रमांक आवश्यक

निवृत्ती कर्मचा-यांसाठी दरवर्षी ईपीएफओमार्फत पीपीओ क्रमांक देण्यात येतो. पीपीओ क्रमांक 12 अंकी असतो. पेन्शनसाठी अर्ज करताना दरवर्षी हयात प्रमाणपत्र आणि पीपीओ क्रमांक देणे आवश्यक असतो. पीपीओ क्रमांक मिळवणे सोपे काम नक्कीच नाही. जर तुम्हाला पीएफ खाते एका बॅंकेतून दुस-या बॅंकेत ट्रान्सफर कारायचे असेल तर पीपीओ क्रमांक आवश्यक असतो. पेन्शनसंबंधीची एखादी तक्रार करायची असेल तर पीपीओ क्रमांक देणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेन्शन ट्रॅक करण्यासाठीदेखील पीपीओ क्रमांक आवश्यक असतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.