मध्य रेल्वेने (Central Railway) ट्रेनचा वेग वाढविण्यासाठी विविध विभागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. यामध्ये एका विभागात अधिक रूळ टाकणे, ओव्हरहेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंगचे काम, तसेच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वे रुळांची देखभाल दर्जेदार पद्धतीने केली जात आहे.
खालील गाड्यांचा धावण्याचा वेग वाढणार
भुसावळ विभाग
- जलंब ते खामगाव दरम्यान ५० किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तासपर्यंत.
- बडनेरा ते अमरावती दरम्यान ६५ किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तासपर्यंत.
- बडनेरा ते चांदूर बाजार मार्गावर १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.
पुणे विभाग
- पुणे ते सातारा दरम्यान १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तास
- सातारा ते मिरज दरम्यान आणि मिरज ते कोल्हापूर दरम्यान १०० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.
नागपूर विभाग
- माजरी ते पिंपळखुटी दरम्यान ५० किमी प्रति तास ते ९० किमी प्रति तास
- ९० किमी प्रति तासपासून ११० किमी प्रति तास
- नरखेड ते कोहली दरम्यान (इटारसी ते नागपूर ३री मार्गिका),
- सिंदी ते बोटी बुरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम ३ री आणि ४ थी मार्गिका)
- चितोडा ते हिंगणघाट दरम्यान (सेवाग्राम ते बल्लारशाह ३ री मार्गिका)
- बोटी बुरी ते खापरी दरम्यान (नागपूर ते सेवाग्राम ३ री आणि ४ थी मार्गिका) वर ८० किमी प्रति तास ते ११० किमी प्रति तासपर्यंत.
Join Our WhatsApp Community