CM Eknath Shinde : मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

262
CM Majhi Ladki Bahin Yojna : अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास होणार कठोर कारवाई

महायुती सरकारच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात राज्यांत रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून आता मुंबईतील रखडलेल्या अनेक एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणाना एकत्रित करून गती देण्यांत येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (२३ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना केली. (CM Eknath Shinde)

लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांचा वाढता ओढा 

निमित्त होते ठाण्यातील किसन नगर येथील त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचा. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वर्षभरापूर्वी महायुती सरकार राज्यांत सत्तेत आल्यानंतर आपल्या नेतृत्त्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सर्वांनी एकत्रित व प्रामाणिक पण प्रयत्न करुन राज्यातल्या गेल्या अडीच वर्षात रखडलेल्या अनेक समाजपयोगी प्रकल्प असो वा योजनांना गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मग ते मेट्रो रेल्वे प्रकल्प असो, सिंचन प्रकल्प असो, वा महिला, शेतकरी, कामगार, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना असो. अशा सर्वच स्तरावर प्रयत्न करत असताना पक्ष वाढीसाठीही पूर्णपणे लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच की काय आमच्या सरकारच्या कामांवर प्रभावित होऊन विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी आदींचा ओढा शिवसेनेकडे वाढत आहे. आणि त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्याचा राजकीय फायदा पक्ष वाढीसाठी कसा करुन घेता येऊ शकेल याकडेही आमचे बारीक लक्ष असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

त्यामुळेच की काय सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाहता आज मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योति खान यांनी मोठ्या विश्वासाने व आपल्या प्रभागातील कामांना गती मिळावी या हेतूने शिवसेनेत माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या ५० नगरसेवकांच्या वर गेली आहे. मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार)

संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहर सुंदर करण्याचा प्रयत्न 

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत. आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत असून त्यामुळे शहर अधिक सुंदर होत आहे. यापूर्वी कधीही मुंबईतील रस्ते धुतलेले कुणी पाहिले होते का..? मात्र आज ते स्वच्छ करून मग धुतले जात आहेत. पावसाळ्यातही आपण जातीने भेट देऊन नालेसफाईची पाहणी केली त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी सचल्याचा फारशा तक्रारी आल्या नाहीत, रस्त्यावर फारसे खड्डे देखील दिसले नाहीत हे सारे करायचे तर प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते प्रत्यक्ष काम करावे लागते घरात बसून हे साध्य होत नाही, असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री, व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. (CM Eknath Shinde)

पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक

मी स्वतः मुख्यमंत्री या नात्याने जातीने लक्ष घालून मुंबईतील रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत व यापुढेही करतं राहीन अशी ग्वाही देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आपण मग ते विक्रोळी पार्क साईट परिसरातील रुग्णालयाची प्रलंबित मागणी असो किंवा या भागातील रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने गती देऊन पूर्ण केले जातील. मुंबईतील आशा रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएसआरडीसी, म्हाडा, सिडको, एमआयडीसी अशा सर्व यंत्रणांना एकत्रित करून या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे यावेळी बोलताना सांगत आता मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.