पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आठवी एसी लोकल!

गेल्यावर्षी मे महिन्यात मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यामुळे वातानुकूलिक लोकलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच आठवी एसी लोकल दाखल होणार आहे. सध्या या लोकलच्या चाचण्या सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

( हेही वाचा : Asia Cup 2023 : भारत – पाकिस्तान सामने होणार की नाही? जय शहांनी केली घोषणा )

आठवी एसी लोकल

पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ ला पहिली एसी लोकल धावली. सुरुवातीच्या काळात या वातानुकूलित लोकल सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला परंतु तिकीट दरामध्ये कपात होताच प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज ७९ एसी लोकल फेऱ्या होतात. आता लवकरत आठवी वातानुकूलित लोकलही पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल होणार आहे. यामुळे निश्चितच एकूण फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होईल. सामान्य लोकल फेऱ्या रद्द करूनच आठवी वातानुकूलित लोकल चालवण्यात येईल. यामुळे प्रवाशांना गारेगार लोकलने प्रवास करता येणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी व सायंकाळच्यावेळी एसी लोकलला एवढी गर्दी होते की एसी लोकलचे दरवाजेही बंद न होण्याच्या घटना अलिकडे घडल्या आहेत याचे व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here