आधार कार्डवर मराठीत अपडेट करा तुमची माहिती! जाणून घ्या प्रक्रिया

155

आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांचे महत्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे शाळेत प्रवेश घेण्यापासून, बॅंकेचे कामकाज, सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना अशा सर्व महत्वाच्या कामकाजात आधार कार्ड अनिवार्य असते. यामुळेच आधार कार्डवरील माहिती अचूक व अपडेटेड असणे महत्वाचे असते. आधारकार्डवर प्रामुख्याने इंग्रजी व हिंदी भाषेत माहिती उपलब्ध असते. मात्र तुम्ही आता मराठी भाषेत सुद्धा तुमच्या आधार कार्डला अपडेट करू शकता याविषयीची माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज )

असे करा तुमचे आधार कार्ड मराठी भाषेत अपडेट 

  • सर्वप्रथम यूआडीएआयच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या. त्यानंतर Aadhaar Service Section या पर्यायाची निवड करा.
  • तुम्हाला आता तुमचा १२ अंकी आधार क्रमांत टाकावा लागेल. कॅप्चा कोड टाकून विचारलेली माहिती भरा.
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर Update Data button वर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचे आधार स्थानिक भाषेत अपडेट करायचे असेल तर स्थानिक भाषेचा पर्याय निवडा.
  • या मध्ये तुम्ही इंग्रजी, हिंदीसह मराठी, गुजराती व इतर उपलब्ध स्थानिक भाषांचा पर्याय सुद्धा निवडू शकता. भाषेचा पर्याय सिलेक्ट केल्यावर तुम्हाला सिलेक्ट केलेल्या भाषेत सर्व माहिती दिसेल.
  • याप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला स्थानिक भाषेत अगदी सहज अपडेट करू शकता. दरम्यान, आधार कार्डवरील नाव, वय, पत्ता, जन्मतारीख यात काही चुका झाल्या असतील तर त्याचुका दुरूस्त करत तुमचे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.