War Room : सरकारी रुग्णालयांतील गर्दीवर नियंत्रणासाठी आता ‘वॉर रूम’

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी 'वॉर रूम' तयार करण्याचे दिले निर्देश

145
War Room : सरकारी रुग्णालयांतील गर्दीवर नियंत्रणासाठी आता 'वॉर रूम'
War Room : सरकारी रुग्णालयांतील गर्दीवर नियंत्रणासाठी आता 'वॉर रूम'
आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रूग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रूग्णसेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’मध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रूग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन  नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत.
उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कामाचे मुल्यमापन, उपस्थिती, रूग्ण सेवा आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे सादरीकरण आज मंत्रालयीन दालनात मंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर करण्यात आले.  याप्रसंगी अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार,  सहसंचालक (तांत्रिक) डॉ. विजय बावीस्कर, सहसचिव विजय लहाने, ट्रान्स ग्लोबल जीओनॉटीक्स कंपनीचे श्रीनिवास आदी उपस्थित होते.
ॲपच्या अनुषंगाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचना देत मंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना ॲप हाताळणी, भरावयाची माहिती याबाबत विभागनिहाय कार्यशाळा घेवून प्रशिक्षीत करावे’.

(हेही वाचा- China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …)

रुग्ण संख्या कमी करण्यासाठी…
– राज्य कामगार विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेताना मंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘विमा योजनेची मुंबईत अंधेरी, वरळी, मुलूंडसारख्या ठिकाणी रूग्णालये आहेत. मात्र येथील खाटांच्या संख्येच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी.
– केंद्र शासनाकडून मिळत असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. रूग्णांलयामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.
– ही रूग्णालये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमार्फत चालविणे शक्य नसल्यास आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालविण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या.

हेही पहा- https://www.youtube.com/watch?v=Q3H88tquges

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.