एकाच वेळी दोन शाखांचे पदवीधर होण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन, ऑनलाइन किंवा एकत्रित स्वरूपात अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. याबाबतची सविस्तर नियमावली बुधवारी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ऑफलाईन, ऑनलाईन अभ्यासक्रमास परवानगी
विद्यार्थ्यांना ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची परवानगी दिली जाईल. बुधवारी यूजीसीच्या वेबसाइटवर जाहीर केल्यानंतर, मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. मार्गदर्शक तत्त्वे वैधानिक संस्था आणि उच्च शिक्षण संस्था नियंत्रित करू शकतात. उपस्थितीबाबतचा निर्णय विद्यापीठ घेईल उपस्थिती अनिवार्य असेल की नाही याचा निर्णय विद्यापीठे घेतील. यूजीसीने तसे आदेश दिलेले नाहीत, असेही व्ह्रच्युअल मिटींगमध्ये जगदीश कुमार म्हणाले.
( हेही वाचा: मुंब्र्यात वस्तरा नाही, तर अतिरेकी सापडतात; राज ठाकरेंकडून आव्हाडांची धुलाई )
विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार
एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन अभ्यासक्रम करायचे असल्यास दोन वेगवेगळय़ा राज्यांमधील शिक्षणसंस्थांमधील अभ्यासक्रमही करता येतील. मात्र, त्यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांच्या तासिकांच्या वेळा एकत्र असू नयेत, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे. एक अभ्यासक्रम सकाळच्या सत्रातील तर दुसरा सायंकाळच्या सत्रातील असावा. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा संस्थांची निवड करावी लागेल. त्याचबरोबर विद्यापीठांनी अशा स्वरूपात प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिलेली असणे आवश्यक आहे. दोन विद्यापीठे करार करून अभ्यासक्रम, परीक्षा यांच्या वेळांबाबत समन्वय साधूनही विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील, असे डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले.