एका रेल्वे तिकिटावर एका स्टेशनवरुन दुस-या स्टेशनपर्यंत प्रवास करता येतो, असे अनेक प्रवाशांना वाटते. पण एकाच रेल्वे तिकिटावर तुम्ही 8 वेगवेगळ्या स्टेशनवर विविध ट्रेनचा प्रवास करु शकता. कारण रेल्वे ‘सर्कुलर जर्नी तिकीट’ या नावाने हे विशेष तिकीट देते. या तिकिटामुळे यात्रेकरु अनेक स्टेशनवर फिरु शकतात.
सर्वसाधारणपणे तिर्थयात्रा आणि पर्यटनस्थळाला भेट देणारे अनेक पर्यटक, यात्रेकरु, प्रवाशी या योजनेचा फायदा घेतात. सर्कुलर तिकीट खरेदी केल्यास कोणत्याही श्रेणीतील प्रवास करता येतो. हे तिकीट तुम्ही थेट तिकीट खिडकीतून खरेदी करु शकत नाही. त्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो.
( हेही वाचा: ‘ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह’ करणं पडलं महागात; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई )
सर्कुलर तिकिटामुळे वेळ आणि खर्चाही वाचतो
जर तुम्ही दुरच्या प्रवासाला निघाला असाल तर विविध स्टेशनवर वेगवेगळे तिकीट खरेदी करण्यापेक्षा या सर्कुलर तिकिटाच्या मदतीने हा प्रवास करता येतो. तुमच्या पर्यटन ठिकाणानुसार, प्रवासाचे नियोजन करु शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि खर्चातही मोठी बचत होते. जर तुम्ही नवी दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत सर्कुलर जर्नी तिकीट खरेदी कराल. तर हा प्रवास नवी दिल्लीपासून याच ठिकाणी संपवावा लागेल. 7 हजार 550 किलोमीटरच्या या प्रवासासाठी सर्कुलर तिकीट 56 दिवसांसाठी वैध राहिल.