Aadhaar च्या नियमांत मोठा बदल, आधार कार्ड काढून 10 वर्ष झाली असतील तर करता येणार ‘हे’ काम

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्वाचे असे कागदपत्र आहे. जवळपास सर्वच सरकारी कागदपत्रे आणि बँक खात्यांना आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आधार कार्डची व्याप्ती ही वाढत आहे. तसेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया(UIDAI)ने सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधारचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता आधार अपडेट करण्यासाठी युआयडीएआयने नियमांत सुधारणा केली आहे.

बायोमेट्रिक अपडेट करता येणार

सरकारी योजनांमध्ये आधार ऑथेंटिकेशनचा वापर वाढवण्यासाठी युआयडीएआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. बदललेल्या नियमांनुसार आता आधार कार्डधारकांना 10 वर्षांमध्ये एकदा आपले बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे,डोळ्यांचे ठसे अपडेट करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आधार कार्डधारकांसाठी ही महत्वाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः 40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा, काय आहे कारण?)

सध्याच्या नियमानुसार केवळ 5 ते 15 वर्ष वयाच्या मुलांनाच बायोमेट्रिक अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बाल आधार कार्ड तयार करण्यात येते. त्यामध्ये मुलांचा केवळ फोटो असतो आणि बायोमेट्रिक त्यांच्या पालकांचे घेण्यात येतात. 15 वर्षानंतर मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यात येतात. तसेच आपल्या आधार नंबरचा गैरवापर होऊ नये म्हणून आधार कार्ड लॉक करण्याचे फीचर देखील आधार कार्ड धारकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here