आता ट्विटर वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, एलाॅन मस्क यांची मोठी घोषणा

सध्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ट्विटर चर्चेत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलाॅन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर, सर्वत्र चर्चा होत आहेत. आता एलाॅन मस्क यांच्या एका ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या काळात ट्विटरचा फुकटात वापर करता येणार नाही. त्यासाठी काही शुल्क भरावे लागणार आहे, असे संकेत एलाॅन मस्क यांनी दिले आहेत. सर्वसामान्य युझर्सला ट्विटर मोफतच वापरता येणार आहे.

सर्वसामान्य यूझर्ससाठी ट्विटर नेहमीच फ्री राहील. पण व्यावसायिक आणि सरकारी यूझर्ससाठी ट्विटर वापरण्यासाठी काही शुल्क द्यावे लागू शकते, असे ट्वीट एलाॅन मस्क यांनी केले आहे.

( हेही वाचा: मनसे आक्रमक: जिथे अजान तिथे जय हनुमान )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here