- ऋजुता लुकतुके
भविष्यनिर्वाह निधी नियामक व विकास प्राधिकरण अर्थात, पीएफआरडीए संस्थेनं राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठीचे काही नियम येत्या १ एप्रिलपासून बदलले आहेत. त्यानुसार आता एनपीएस खातेधारकांना आपल्या खात्याची ऑनलाईन माहिती घेणाऱ्यांसाठी खातेधारकांना दोन पातळ्यांवर आपली ओळख पटवावी लागेल. आणि यात आधार क्रमांकावर आधारित ऑथेंटिफिकेशनही असेल. ग्राहकांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून हा बदल करण्यात आला आहे. आणि नियमांतील हा बदल १ एप्रिलपासून लागू होणार आहे. (NPS Rule Updated)
नवीन यंत्रणा कशी काम करणार?
आतापर्यंत एनपीएस खात्यात लॉग-इन करण्यासाठी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड एवढी माहिती लागत होती. इथून पुढे तुमचं खात्यातील लॉग-इन हे आधारशी जोडलेलं असेल. म्हणजे तुम्हाला पासवर्ड टाकल्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक सहा आकडी ओटीपी क्रमांक पाठवला जाईल. आणि तो टाकल्यावरच तुमचं खातं सुरू होईल. (NPS Rule Updated)
New 2-factor authentication system for NPS accounts soon; details herehttps://t.co/nmdQBgglTC#NPS #NationalPensionSystem #PFRDA #CentralRecordkeepingAgency #GovernmentNodalOffices #TwoFactorAuthentication
— Fortune India (@FortuneIndia) February 21, 2024
याचा महत्त्वाचा फायदा हा खात्याची अतिरिक्त सुरक्षितता हा आहे. तुमच्या खात्यात तुमच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींनी लॉग-इन करू नये आणि खातेधारकालाच खात्याविषयीची माहिती मिळावी, त्यात व्यवहार करता यावेत यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. एनपीएस खातेदारांसाठी असलेली वेबसाईट ही सेंटर फॉर रेकॉर्ड किपिंग एजन्सीकडून चालवली जाते. (NPS Rule Updated)
नवीन सुविधा सुरू होण्यासाठी एनपीएस यंत्रणेशी आधार क्रमांक जोडलेला असणं आवश्यक आहे. आणि सरकारकडून पूर्वीच त्यासाठीची पावलं उचलली गेली आहेत. आता नवीन यंत्रणेनुसार, चुकीच्या खातेधारकांना लॉग-इन करण्यापासून रोखणारी प्रणाली सीआरएला बसवायची आहे. त्यामुळे पासवर्ड आणि आधार क्रमांक चुकला किंवा ओटीपी चुकला तर सुरक्षिततेच्या कारणावरून तो लॉग-इन आयडीच काही काळासाठी निलंबित करण्यात येईल. आणि खातेदार योग्य असल्याची खात्री पटल्यावरच ऑनलाईन लॉग-इन पुन्हा सुरू करण्यात येईल. यासाठी आधार कार्डाची एनपीएस खात्याशी जोडणी अनिवार्य करण्यात आली होती. (NPS Rule Updated)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community