नॅशनल पेन्शन सिस्टम(NPS)अंतर्गत पेन्शनचे पैसे काढणे आता अधिक सोपे झाले आहे. केवळ एक फॉर्म भरुन आता या योजनेंतर्गत येणारे पेन्शनधारक आपल्या पेन्शनचे पैसे काढू शकतात. त्यामुळे पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकारण(IRDAI) आणि पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण(PFRDA)ने NPS सदस्यांना एन्युटी जारी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता केवळ एक Withdrawal Form भरुन पेन्शनधारक आपले पेन्शन काढू शकतात. त्यामुळे एन्युटी निवडण्यासाठी आता एनपीएस सदस्यांना वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
(हेही वाचाः 10वी व 12वीच्या परीक्षांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 2023 च्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार)
काय आहे सध्याचा नियम?
सध्याच्या प्रक्रियेनुसार, NPS पेन्शनधारकांना पैसे काढण्यासाठी PFRDA कडे तपशीलवार एक्झिट फॉर्म सबमिट करणे आवश्यक होते. आपल्या पसंतीनुसार, पेन्शनधारकांनी एन्युटी योजनेचा निर्णय घेतला की त्यांनी विमा कंपन्यांनी प्रदान केलेला प्रस्ताव फॉर्म पूर्णपणे भरणे गरजेचे होते. पण PFRDAच्या परिपत्रकानुसार,दोन आर्थिक नियामकांच्या एकत्रिकरणामुळे एनपीएस सदस्य आणि भागधारकांना मिळणारे फायदे वाढले आहेत.
मिळणार हे फायदे
- एन्युटी मिळवणे सोपे होणार आणि जारी करण्यास लागणारा वेळ कमी होणार
- एकरक्कमी पेमेंट आणि एन्युटी जारी करण्याची प्रक्रिया समांतर होणार
- एनपीएस सदस्याच्या निवृत्तीनंतर एन्युटीद्वारे सेवानिवृत्तीच्या उत्पन्नाचा भरणा आणि सेवानिवृत्तीसाठी नियमित उत्पन्न सुनिश्चित करणे
- सोपे ओल्ड एज इनकम सपोर्ट
- संबंधित स्टेक होल्डर्ससाठी काम सोपे करणे