चीनची ‘आण्विक पाणबुडी’ (Nuclear Submarine) समुद्रात बुडाल्याचा दावा अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. चीनने बांधलेली नवीन अणुशक्तीवर हल्ला करणारी पाणबुडी या वर्षाच्या सुरुवातीला समुद्रात बुडाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, चीनची नवीन, प्रथम श्रेणीची, अणुऊर्जेवर चालणारी, हल्ला करणारी पाणबुडी (submarine) मे ते जून या काळात बुडाली. तसेच अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, बीजिंगसाठी (Beijing) ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. चीनकडे आधीच ३७० हून अधिक जहाजांसह जगातील सर्वात मोठे नौदल आहे. (Nuclear Submarine)
एका अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, चीनची नवीन प्रथम श्रेणी अणुशक्तीवर चालणारी (nuclear powered) हल्ला पाणबुडी मे ते जून दरम्यान समुद्रात बुडाली आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. असे उत्तर एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर अशी माहिती दिली. “तुम्ही नमूद केलेल्या परिस्थितीबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत आणि सध्या आमच्याकडे देण्यासाठी कोणतीही माहिती नाही”, असे चिनी अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा – Urban Planner Salary: शहरी नियोजकांचा प्रारंभिक पगार किती?)
प्लॅनेट लॅब्सने जूनमध्ये घेतलेल्या सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत, यामध्ये चीनमधील वुचांग शिपयार्डमध्ये क्रेन दिसत आहेत. यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स पेंटागॉनच्या अहवालानुसार, २०२२ पर्यंत तीन अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, सहा अणुऊर्जेवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे आणि ४८ डिझेलवर चालणारी हल्ला क्षेपणास्त्रे असतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community