Church : झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्‍यांतील चर्चच्‍या संख्‍येत दुपटीने झाली वाढ

जशपूर (छत्तीसगड) जिल्‍ह्यात वर्ष २००७ मध्‍ये आदिवासींच्‍या जमिनीवर चर्च बांधण्‍यात आल्‍याची २५० प्रकरणे न्‍यायालयात दाखल करण्‍यात आली होती. न्‍यायालयाने सर्व जमीन अतिक्रमणमुक्‍त करण्‍याचे आदेश दिले.

120

देशातील झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या ४ राज्‍यांत गेल्‍या १० वर्षांत चर्चची (Church) संख्‍या जवळपास दुप्‍पट झाली. एका सर्वेक्षणानुसार वर्ष २०११-१२ मध्‍ये या राज्‍यांमध्‍ये १२ हजार ३०० चर्च होते, ते आता २५ हजाराहून अधिक झाली आहेत. झारखंडमधील गुमला जिल्‍ह्यातील अनेक गावांत ९० लोक ख्रिस्‍ती झाली आहेत. ते आता त्‍यांच्‍या घराबाहेर क्रॉसचे चिन्‍ह लावतात.

आदिवासींच्‍या जमिनीवर बेकायदेशीर बांधले चर्च

बेकायदेशीर धर्मांतर आणि चर्च (Church) यांच्‍या विरोधात कायदेशीर लढा लढणारे सरकारी वकील राम प्रकाश पांडे यांनी सांगितले की, आदिवासींचे धर्मांतर करून त्‍यांच्‍या जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. मग इथे चर्च, शाळा, रुग्‍णालये बांधली जात आहेत. नियमानुसार एखादा आदिवासी दुसर्‍या आदिवासीलाच जमीन देऊ शकतो; मात्र आदिवासीबहुल गावांमध्‍ये बांधलेली सर्व चर्च आदिवासींच्‍या जमिनीवर आहेत.

(हेही वाचा Dahihandi 2024 : गोविंदांना नो-टेन्शन; १ लाखाहून अधिक जणांचा विमा निघालाय)

न्‍यायालयाच्‍या आदेशानंतरही अतिक्रमणांवर कारवाई नाही

जशपूर (छत्तीसगड) जिल्‍ह्यात वर्ष २००७ मध्‍ये आदिवासींच्‍या जमिनीवर चर्च बांधण्‍यात आल्‍याची २५० प्रकरणे न्‍यायालयात दाखल करण्‍यात आली होती. न्‍यायालयाने सर्व जमीन अतिक्रमणमुक्‍त करण्‍याचे आदेश दिले. वर्ष २००९ मध्‍ये तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी अतिक्रमण मुक्‍तीसाठी बडा करोडा येथे गेले असता त्‍यांना चर्चमध्‍ये (Church) ओलीस ठेवण्‍यात आले होते. त्‍यानंतर आजतागायत या जमिनीवरील अतिक्रमण कुणीही हटवू शकलेले नाही. वर्ष २००७ ते २०२४ या कालावधीत ११६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. या सर्वांच्‍याच जमिनीवर चर्च बांधण्‍याच्‍या आणि ते ताब्यात घेण्‍याच्‍या तक्रारी आहेत.

छत्तीसगडमध्‍ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर

छत्तीसगडमधील सन्‍ना ब्‍लॉकमध्‍ये ५० गावे आहेत. तेथील केवळ ५ गावांमध्‍ये अद्याप कुणीही ख्रिस्‍ती झालेले नाहीत. सराईटोली गावात १०० हून अधिक घरे ख्रिस्‍त्‍यांची आहेत. आता तेथे केवळ हिंदूंचे एकच घर उरले आहे. पारसपूरमध्‍येही हिंदूंची केवळ तीनच घरे आहेत. त्‍याचप्रमाणे करडीहमध्‍ये ९० टक्‍के ख्रिस्‍ती झाले आहेत. जशपूरमध्‍ये एक चर्च होते, आता ५० आहेत. विशेष म्‍हणजे या हिंदूंचे धर्मांतर केल्‍यानंतर त्‍यांची नावे पालटली जात नाहीत. त्‍यामुळे ते नावावरून ख्रिस्‍ती म्‍हणून ओळखले जात नाहीत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.