दोन वर्षांत पहिल्यांदा कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या कहरात मानसिक आणि शारिरीक त्रास वाढत असताना अखेर तिस-या लाटेच्या अंतकाळात सर्वात कमी रुग्णसंख्या आणि एकही मृत्यू नसलेला दिवस उजाडला आहे. सोमवारी राज्यभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, आतापर्यंतची सर्वात कमी २२५ कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे.
( हेही वाचा : उकडतंय म्हणून मोकळी हवाही मुंबईकर घेऊ शकत नाहीत, का ते वाचा )
आरोग्य विभागाची माहिती
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.७ टक्क्यांवर कायम असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी ४६१ रुग्णांना घरी सोडल्यानंतर आता केवळ ३ हजार ४७२ कोरोनाचे रुग्ण उरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर घरात विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या २८ हजार ९७५ आहे. तर केवळ ५८९ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आता राज्यात जनुकीय तपासणीत दिसून आलेल्या केवळ ५० ते ७५ ओमायक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्का
राज्यात आतापर्यंत दिसून आलेली कोरोनाबाधितांची संख्या – ७८ लाख ६९ हजार ३८
राज्यात आतापर्यंत बरे झालेले कोरोनाबाधित रुग्ण – ७७ लाख १७ हजार ८२३