मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या आत! मृतांची संख्या ४४

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा २५५ दिवसांवर आला आहे.

192

मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा कमी होऊ लागला आहे. मंगळवारी ९५३ रुग्ण आढळले. तर सोमवारी दिवसभरात ४४ रुग्ण मृत्यू पावले.

मंगळवारी दिवसभरात एकूण १७,९२० जणांची कोविड चाचणी करण्यात आली. मंगळवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ३२ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू होता. मृतांचा आकडा हा ४४ एवढा होता. यामध्ये २८ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये २६ पुरुष आणि १८ महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील ३१ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ११ एवढी होती.

(हेही वाचा : मुंबई महापालिकेने खरेदी केले १,२०० ऑक्सिजन काँसेंट्रेटर!)

मुंबईतील दुपटीचा दर हा २५५ दिवसांवर

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील दुपटीचा दर हा २५५ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ३०५ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ७८ एवढी आहे.

वादळामुळे चाचण्या कमी झाल्या

१८ मे रोजी मुंबईला तौक्ते या वादळाने थैमान घातले. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या होऊ शकल्या नाही, तरीही रुग्णाची संख्या कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.