मुंबईतील रुग्णसंख्या सोमवारी १,२४०, मृतांचाही आकडा ४८वर

मुंबईतील दुपटीचा दर हा २४६ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा कमी होऊ लागला आहे. सोमवारी १,२४० रुग्ण आढळले. तर सोमवारी दिवसभरात ४८ रुग्ण मृत्यू पावले.

सोमवारी दिवसभरात एकूण १७,६४० जणांची कोविड चाचणी करण्यात आली. सोमवारीपर्यँत संपूर्ण मुंबईत ३४ हजार २८८ रुग्णांवर उपचार सुरू होता. मृतांचा आकडा हा ४८ एवढा होता. यामध्ये २८ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये २९ पुरुष आणि १९ महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील ६ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील २७ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १५ एवढी होती.

(हेही वाचा  : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात अंधार! महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द)

मुंबईतील दुपटीचा दर हा २४६ दिवसांवर

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील दुपटीचा दर हा २४६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ३११ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ७७ एवढी आहे.

वादळामुळे चाचण्या कमी झाल्या 

१७ मे रोजी मुंबईला तौक्ते या वादळाने थैमान घातले. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या होऊ शकल्या नाही, तरीही रुग्णाची संख्या कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here