देशात कोरोना रुग्ण संख्या ३ लाखांच्या दिशेने!

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि रुग्ण संख्याही वाढते आहे. 

74

देशभरात कोरोनाचा अक्षरशः हैदोस सुरु आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नव नवे विक्रम मोडत आहे. १६ एप्रिल रोजी कोरोनाचे देशात 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. तर 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला. मात्र 1,341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 वर  झाली आहे, तर त्यातील 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना देण्यात आला आहे. सध्या देशात 16 लाख 79 हजार 740 जणांवर उपचार सुरु असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 लसीकरण करण्यात आले आहे.

(हेही वाचा : कोरोना रुग्णसंख्या ९ हजाराच्या आतच, मृत्यूचा आकडा पुढे सरकतोय!)

काय आहे महाराष्ट्राची परिस्थिती? 

महाराष्ट्रात 16 एप्रिल रोजी 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात १६ एप्रिल रोजी 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झाला आहे. दिवसभरात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 30 लाख 04 हजार 391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारांटाईन आहेत, तर 25 हजार 168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.