डिस्चार्ज रुग्णांची संख्या पुन्हा खालावली…दिवसभरात दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण बंदिस्त

मंगळवारी राज्यात ३४ हजार ४२४ नव्या रुग्णांचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी एकाच दिवसात राज्यांत दोन लाखांपेक्षा अधिक जणांना घरी विलगीकरणात ठेवण्यात गेले. सोमवारी १२ लाख ४६ हजार ७२९ जणांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले, तर मंगळवारी १४ लाख ६४ हजार ९८७ जणांना घरी विलगीकरणात ठेवले गेले. मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी डिस्चार्ज रुग्णांची संख्या तुलनेने खालावलेली होती. सोमवारी २९ हजार ६७१ रुग्णांना कोरोना उपचारांतून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाला होता. मंगळवारी केवळ १८ हजार ९६७ रुग्णांना घरी पाठवण्यात आले.

३४ रुग्णांनाचाच शोध लावण्यात आरोग्य विभाग यशस्वी

मंगळवारी नव्या वर्षात पहिल्यांदात कोरोना मृत्यूचा आकडा जास्त आढळला. २२ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. मात्र राज्यातील तिसरी लाट ओमायक्रॉन विषाणूची असल्याची कल्पना असतानाही मंगळवारीही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या फारशी दिसून आली नाही. केवळ ३४ रुग्णांनाचाच शोध लावण्यात आरोग्य विभाग यशस्वी झाले. पुण्यातून ३१, सोलापूरातून २ आणि पनवेलहून ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला. आजपर्यंत केवळ १ हजार २८१ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या राज्यात आढळली आहे. त्यापैकी ४९९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या केवळ ७८२ सक्रीय ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा सलग दुस-या दिवशी नाशकात राज्यातील नीच्चांकी तापमान! बोच-या थंडीला हलका ब्रेक)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here