पुन्हा मुंबईची रुग्णसंख्या रोडावली!

रुग्ण दुप्पटीचा दर हा ८२९ दिवसांएवढा आहे.

मागील तीन दिवसांपर्यंत पाचशेपर्यंत सीमित असलेली कोविडबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत साडेसहाशेच्या घरात पोहोचली होती. पण दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा ही रुग्णसंख्या पाचशेच्या खाली येवून साडेचारशे झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४६ नवीन रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे मागील दोन्ही दिवस कोविड चाचण्यांची संख्या ३५ हजारांहून अधिक केल्यानंतरही गुरुवारी ५४५ आणि शुक्रवारी ४४६ रुग्ण आढळून आले आहे. मुंबईकरांसाठी हा शुभसंकेत असून कोविड चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णसंख्या पाचशेच्या आतच राहिल्यास मुंबईकरांना सर्व मोकळे करून द्यावे लागेल.

शुक्रवारी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली!

बुधवारी ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ६३५ रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी दिवसभरात ३६ हजार ५६८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर हे ५४५ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर शुक्रवारी  ३५ हजार ३६२ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये शु्क्रवारी  ४७० रुग्ण  बरे होवून घरी परतले. तर शुक्रवारपर्यंत ६ हजार ९७३ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते.  गुरुवारी जिथे  १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शुक्रवारी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.  या ११ रुग्णांपैंकी ०८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ०७ रुग्ण हे पुरुष तर ०४ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये ८ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत ३ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.

रुग्ण दुप्पटीचा दर हा ८२९ दिवसांवर गेला!

मुंबईतील रुग्णांचे बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ८२९ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या सातवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ७० वर आली आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here