धारावी, दादरमधील रुग्णसंख्या एकअंकी!

माहिम, दादर आणि धारावी या जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या चार दिवसांपासून २५च्या आसपास!

73

मुंबईतील धारावीत गुरुवारी केवळ १ बाधित रुग्ण आढळून आला असून फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच धारावी आता शुन्याच्या अगदी जवळ जावून पोहोचली आहे. याबरोबरच दादर परिसरही एक अंकी आकड्यावर आला आहे. दादरमध्ये गुरुवारी केवळ ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जी उत्तर विभागातील रुग्णांची आकडेवारी खाली येवून दिवसभरात केवळ २४ रुग्णांची नोंद झाली आहे.

(हेही वाचा : मुंबईतील नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेले! काँग्रेसकडून पोलखोल!)

जी उत्तर विभागातील रुग्ण संख्या चार दिवसांपासून २५च्या आसपास!

मुंबई महापालिकेच्या माहिम, दादर आणि धारावी या जी उत्तर विभागातील रुग्णांचा आकडा आता खालच्या दिशेने सरकत चालला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून रुग्णांची संख्या २५च्या आसपासच सीमित राहिलेली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी २६ रुग्ण आढळून आलेले असतानाच गुरुवारी या तिन्ही भागांमध्ये २४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये माहिममध्ये १७ रुग्ण तर दादरमध्ये ०६ आणि धारावीमध्ये अवघा एक रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत या संपूर्ण जी उत्तर विभागांमध्ये बाधित रुग्णांची संख्या २६ हजार ९७ एवढी झाली असून त्यातील केवळ ४०८ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. धारावीमध्ये एकमेव रुग्ण आढळून आला असला तरी संपूर्ण धारावीमध्ये गुरुवारपर्यंत १९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दादरमध्ये १५६, तर माहिमध्ये २३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि टिमने केलेल्या अथक प्रयत्नामुळे धारावी, दादरसह जी उत्तर विभागातील रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.