मुंबईत शनिवारी रुग्ण संख्या १,४४७, मृतांचाही आकडा ६२ वर!

मुंबईतील कोविड रुग्णांचा दुपटीचा दर हा २१३ दिवसांवर आला आहे.

97

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा कमी होऊ लागला आहे. शुक्रवारी दिवसभरात जिथे १,६५७ रुग्ण  आढळून आले होते, तिथे शनिवारी १,४४७ रुग्ण आढळले. तर शनिवारी दिवसभरात ६२ रुग्ण मृत्यू पावले.

३६ हजार ६७४ रुग्णांवर उपचार सुरू होते!

शुक्रवारी दिवसभरात एकूण २४ हजार ८९६ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तर शुक्रवारी २ हजार ३३३ रुग्ण बरे होवून घरी परतले. शनिवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ३६ हजार ६७४ रुग्णांवर उपचार सुरू होते. शुक्रवारी जिथे मृतांचा आकडा हा ६२ एवढा होता. तेवढाच आकडा शनिवारी होता. यामध्ये ४१ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये ४२ पुरुष आणि २० महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील पाच रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील ४४ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १३ एवढी होती.

(हेही वाचा : रविवारी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटर!)

रुग्ण दुपटीचा दर हा २१३ दिवसांवर!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९२ टक्के एवढा आहे. मुंबईतील दुपटीचा दर हा २१३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ३७७ इमारती सील तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही ८७ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.