मुंबईमध्ये मागील काही वर्षांपासून दुचाकींची संख्या वाढत असून, कोविड काळात सर्व दुकाने आणि सर्विस सेंटर बंद असतानाही दुचाकींची लक्षपूर्ती झाली आहे. कोविड काळात चक्क १ लाख १२ हजार ४१७ दुचाकींची संख्या वाढली आहे. प्रत्यक्षात या आर्थिक वर्षात १ लाख १६ हजार ७९४ दुचाकींची नोंदणी मुंबईतील विविध आरटीओ कार्यालयात पार पडली आहे.
इतकी वाढली संख्या
मुंबईतील रस्त्यांवर विविध वाहनांची वाहतूक होत असली, तरी ३० मार्च २०२१ पर्यंत मुंबईत वाहनांची संख्या एकूण ४० लाख ३३ हजार ४९७ एवढी आहे. यामध्ये दुचाकींची संख्या २४ लाख ७ हजार १६ एवढी आहे. मात्र ३१ मार्च २०२० पर्यंत दुचाकींची संख्या ही २२ लाख ९४ हजार ५९९ इतकी होती. मागील मार्च २०२० पासून कोविडमुळे संपूर्ण मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ रोजी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. परंतु या कोविड काळात सर्व दुकाने आणि नोंदणीही बंद असताना, मुंबईत १ लाख १२ हजार ४१७ दुचाकींची संख्या वाढली. विशेष म्हणजे या कालावधीत १ लाख १६ हजार ७९४ दुचाकींची नोंदणी मुंबईतील विविध आरटीओ कार्यालयात नोंदवली गेली होती.
(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)
या भागांत झाली सर्वाधिक नोंदणी
मुंबईत सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण नोंदणी झाली त्यात १ लाख ७१ हजार २०६ वाहनांपैकी दुचाकींची संख्या १ लाख १६ हजार ७९५ एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकींची नोंदणी ही पूर्व मुंबईत झाली आहे. त्याठिकाणी एकूण ३४ हजार २२९ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल ३१ हजार ७६६ दुचाकींची नोंदणी ही मध्य मुंबईत आणि पश्चिम मुंबईत २१ हजार १०८ व बोरीवलीत २९ हजार ६९१ दुचाकींची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्याच्या वाहतूक आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
दुचाकींची वर्षनिहाय वाढलेली संख्या आणि वर्षातील वाढलेली संख्या
सन २०१९: एकूण संख्या– २१ लाख ३३ हजार ८३३ (१ लाख ८० हजार ८७८)
सन २०२०: एकूण संख्या– २२ लाख९४ हजार ५९९ (१ लाख ६० हजार ७६६)
सन २०२१: एकूण संख्या – २४ लाख ७ हजार १६ (१ लाख १२ हजार ४१७)
मुंबईतील दुचाकींची एकूण संख्या: २४ लाख ७ हजार १६
पेट्रोलवर आधारित दुचाकींची संख्या: २४ लाख ५ हजार ७२६
सीएनजीवर आधारित दुचाकींची संख्या: ४
इलेक्ट्रिकवर आधारित दुचाकींची संख्या: १ हजार २८६
(हेही वाचाः रेल्वेच्या डब्यांत होणार फिरते रेस्टॉरंट… या सात स्थानकांत करणार उभारणी)
Join Our WhatsApp Community