मुंबईत यंदा बाप्पा वाढले : तब्बल २८ हजार ९३३ पेक्षा अधिक गणेश मूर्तींची झालेली प्रतिष्ठापना

विघ्नहर्त्या श्री गणेशाला आपल्या घरी विराजमान करत त्यांची मनोभावे पुजाअर्चा करणाऱ्या भाविकांनी मागील वर्षी कोविडमध्ये चक्क उत्सवाकडेच पाठ फिरवली होती. कोविडच्या लॉकडाऊनमुळे काहींनी गाव गाठले होते, तर काहींनी आर्थिक परिस्थितीमुळे बाप्पांना आपल्या घरी विराजमान केले नव्हते. त्यामुळे मागील वर्षी या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक व घरगुती अशाप्रकारे एकूण १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. परंतु यंदाही ही संख्या १ लाख ९३ हजार ०६२ सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २८ हजार ९३३ मूर्तींची अधिक प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर सन २०१९च्या तुलनेत मात्र ३,४२१ गणेश मूर्तींची संख्या कमी झाल्याचेही दिसून येत आहे.

यंदा किती गणेश मूर्तींच्या स्थापना केलेल्या?

श्री गणरायांचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर भाविकांनी आपल्या दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवस तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना निरोप देत मूर्तीचे विसर्जन केले. या सर्व दिवशी मिळून अनंत चतुर्दशीपर्यंत १लाख ९३  हजार ०६२ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ९९६७ आणि घरगुती १ लाख ७६ हजार ३०० तसेच ६,७९५ हरतालिका व गौरींचा समावेश होता. सन २०२१मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये १ लाख ६५ हजार ०४० सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. त्यामध्ये ८ हजार ४९ सार्वजनिक आणि १ लाख ५० हजार ४५४ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता. तर कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये अर्थात सन २०२०मध्ये एकूण १ लाख ३५ हजार  ५१५ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. यामध्ये ६,४४३ सार्वजनिक आणि १ लाख २४ हजार ९३० घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता.  तर सन २०१९मध्ये एकूण १ लाख ९६ हजार ४८३ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामध्ये १२ हजार ३३ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्ती तर १ लाख ७९ हजार ०६२ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता. सन २०१९मध्ये कोणत्याही प्रकारचा कोविडचे सावट नव्हते. यावर्षी साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवातील प्रतिष्ठापना झालेल्या गणेश मूर्तींची संख्या पाहता कोविड निर्बंधमुक्तीनंतर प्रथमच होणाऱ्या उत्सवात ३४२१ गणेश मूर्तींची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचाभारत जोडो यात्रेसाठी राहूल गांधींचा 41,000 रुपयांचा टी-शर्ट )

सार्वजनिक गणपती मूर्तींमध्येही १ हजार ९१८ संख्येने वाढ

मागील दोन वर्षांच्या तुलनेत सन २०२१ व २०२२मध्ये एकूण घरगुती गणपतींची संख्या अनुक्रमे १,५०,४५४ व १,७६,३०० एवढी होती, त्यामुळे घरगुती गणपती प्रतिष्ठापना झालेल्या मूर्तींची संख्या २५ हजार ८४६ एवढ्या मूर्तींची संख्या वाढलेली पहायला मिळाली. तर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सन २०२१ व २०२२ मध्ये अनुक्रमे ८,०४९ व ९,९६७ मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींमध्येही १ हजार ९१८ गणेश मूर्तींमध्ये वाढ झाल्याचे विसर्जित आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

एकूण प्रतिष्ठापना झालेल्या आणि विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या

  • सन २०२२ :  १ लाख ९३ हजार ०६२ (घरगुती :१,७६,३०० ,सार्वजनिक :९,९६७ )
  • सन २०२१ :  १ लाख ६४ हजार ७६१ (घरगुती :१,५०,४५४ ,सार्वजनिक : ८,०४९)
  • सन २०२० :  १ लाख ३५ हजार ५१५ (घरगुती :१,२४,९३० ,सार्वजनिक : ६,४४३)
  • सन २०१९ :  १ लाख ९६ हजार ४८३ (घरगुती :१,७९,०६२ ,सार्वजनिक : १२,०३३)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here