गोवरचे रुग्ण नऊशेपार, संशयित रुग्ण संख्येत वाढ

99

गोवर या विषाणूमुळे वाढणा-या संसर्गजन्य आजाराचा राज्यातील 18 भागांतील 121 ठिकाणी उद्रेक झाला आहे. शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता उल्हासनगरमध्येही गोवरचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता 940 रुग्णांना गोवरची लागण झाली आहे, तर संशयित रुग्णांची संख्या 14 हजार 440 पर्यंत पोहोचली आहे.

40 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत

उल्हासनगरमध्ये गोवरचे दोन रुग्ण आढळले आहेत. तर 77 संशयित रुग्ण आरोग्य अधिका-यांना सापडले. राज्यात सर्वात जास्त गोवर रुग्णांची संख्या मुंबईत दिसून येत आहे. मुंबईतील 56 ठिकाणी तब्बल 442 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील तब्बल 40 टक्क्यांहून अधिक गोवरचे रुग्ण एकट्या मुंबई शहरांत सापडत आहेत. मुंबई खालोखल मालेगाव येथे 71, भिवंडी शहरांत 53, तर ठाण्यात 50 गोवरबधित रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत.

  • राज्यभरात एकूण आरोग्य विभागाची कार्यरत पथके -1 हजार 228
  • आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरे – 16 लाख 97 हजार 602
  • अ जीवनसत्त्वाची मात्रा दिलेल्या बालकांची संख्या – 46 हजार 357
  • गोवर रुबेला पहिला डोस दिलेल्या बालकांची संख्या – 19 हजार 845
  • गोवर रुबेला दुसरा डोस दिलेल्या बालकांची संख्या – 10 हजार 871
  • शुक्रवारी आयोजित अतिरिक्त लसीकरण सत्रे – 273
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.