मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची घटलेली संख्या ही आता अजून कमी होवू लागली असून शनिवारी दिवसभरात ५,८८८ रुगण आढळून आले. तर मृतांचा आकडा सत्तरीच्या आसपासच स्थिरावलेला आहे. शनिवारी दिवसभरात ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ८ हजार ५४९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
(हेही वाचा : लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचाराचे सीसीसी टू केंद्रे अर्धी रिकामीच! )
२१ हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरु!
मुंबईत शनिवारी दिवसभरात ५ हजार ८८८ रुग्ण आढळून आले. मागील चार दिवसांपासून साडेसात हजारांच्या आसपासच रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे. मात्र, शनिवार संपूर्ण मुंबईत ७८ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. संपूर्ण दिवसभरात एकूण ३९ हजार ५८४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मृत रुग्णांचा आकडा ७१ एवढा आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमधील ३४ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. या मृतांमध्ये ३८ पुरुष व ३३ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील २ रुग्ण हे ४० वर्षांखाली आहेत. तर ४५ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. आणि ४० ते ६० वयोगटातील २४ रुग्ण आहेत. मुंबईतील विविध कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये २१ हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community