सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात परिचारिका संघटनेचाही सहभाग; रुग्णालयीन सेवेवर होणार परिणाम

प्रातिनिधीक छायाचित्र
जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवार, १४ मार्चपासून राज्यभरातील सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यांना  महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
१४ मार्च २०२३ पासून जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र मार्फत राज्य मार्फत कर्मचारी व शिक्षकांचा राज्यव्यापी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे. राज्यातील विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या निर्णयानुसार राज्यातील २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह इतर जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटना आपल्या ३४ शाखांसह सहभागी होनार आहे, त्यामुळे याचा परिणाम रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here